प्रकार

Thursday, April 27, 2006

बघू कसं जमतय ते

काही दिवसांपासून एक नवीन ब्लॉग लिहावा असा मनात विचार होता. मनातलं शब्दांत उतरवण्यासाठी "मनात आलं.." पुरेसा आहे पण माझ्या भन्नाट वाचनांत अनेक चित्रविचित्र गोष्टी येत असतात.... आणि त्या माझ्या भाषेत लिहून काढायची अतीव उर्मी मला काही दिवसांपासून होत आहे.

काही दिवसांपूर्वी सहजच मला भोसल्यांच्या तंजावूर शाखेबद्दल वाचायला मिळालं. सरफोजी राजांच साहित्य प्रेम, पुस्तक प्रेम, त्यांच आरोग्य शाखेबद्दलच्या अफाट कुतुहलाबद्दल वाचलं. डोक्यात खूप गोष्टी आहेत. विचारांना भाषेचे बंध नसतात. भाषेला शब्दांचे बंध नसतात. इतिहासाला काळाची तमा नसते. सरफोजी राजे, सरस्वती महाल लायब्ररी, महाबलीपुरम, सरस्वती नदी, ऍंगकोरच्या हिंदू राजांची वंशावळ, त्यांचे कलाप्रेम, चैत्रालची कलाश जमात वगैरे वगैरे. तसा एकाचा दुसऱ्याशी संबंध नाही पण हे सर्व माझ्या शब्दांत, माझ्या भाषेत निबंधरुपाने जमवून ठेवायला मला आवडेल. माझ्या भटकत्या मनातल्या आणि काळाच्या ओघात विसरुन गेलेल्या गोष्टी संकलीत करायच ठरवलं आहे.

ब्लॉगला नाव काय द्याव ते अजून ठरवायचय. "भूले बिसरे", "भूले भटके" ... डोक्यात हिंदीच का येतय कुणास ठाऊक?...बघू कसं जमतय ते.

5 comments:

Sumedha said...

"आठवणींचे झरोके" कसं वाटतंय? सहज सुचलं :-)

ब्लॉग छान आहे. अजून नवीन वाचत रहायला नक्की आवडेल!

Nandan said...

नवीन ब्लॉग वाचायला आवडेल. सुमेधा यांनी सुचवलेल्या 'आठवणींचे झरोके' व्यतिरिक्त 'इतस्ततः' हे नाव कसे वाटते? शांता शेळकेंचे याच नावाचे एक पुस्तक आहे, त्यावरून आठवले.

Priyabhashini said...

अग, नाव खूप छान आहे पण मला थोड सयुक्तिक नाही वाटत कारण माझ्या डोक्यातले सगळे विषय Historical, ancient etc. आहेत.

पण मी हे नाव राखून ठेवते हं! म्हणजे आधी संगीत मग शब्द, त्याप्रमाणे आधी title मग लेख.

मला वाटत माझ्याकडे आहे "आठवणींचे झरोके" शी संबंधीत. पोस्ट करीन लवकरच. Thanks a lot.

Priyabhashini said...

तुम्ही सुचवलेलं नाव ही सुंदर आहे नंदन. "इतस्तत: विखुरलेले मोती" कस वाटतय? मालगाडी सारख लांबलचक नाही ना?

मला उगीचच विस्मृतीत गेलेल्या गोष्टींबद्दल आणि व्यक्तींबद्दल खंत वाटत असते, म्हणून हा प्रपंच. विकिपिडियावर जिजाबाईंबद्दल सध्या एक लेख लिहिते आहे. त्याच्याच अनुषंगाने नव्या ब्लॉगला सुरुवात करावी असं म्हणत्ये.

लिंक देत्ये.. अजून अपूर्ण आहे पण लवकरच पूर्ण होईल.

येथे टिचकी मारा

P said...

नुस्त "विखुरलेल मोती" पण छान वाटेल.नव्या blog ची idea मस्तच आहे. त्यात वेगवेगळ्या categories केल्या तर आणखीणच छान वाटेल वाचायला.good luck.

marathi blogs