असा म्हसोबा, जन्मभरचा नवरोबा असतो
मनोगतावरील एका कवितेवरून हे विडंबन सुचले. याला विडंबन म्हणावे की प्रेरणा याबाबत मनात थोडा संदेह आहे.
सांभाळत ढेरी टकलावरचे केस चार विंचरतो
आरशामध्ये चोरून शतदा स्वतःला बघतो
अजूनही चाळीशीची बायको परी दिसावी म्हणतो
असा म्हसोबा, जन्मभरचा नवरोबा असतो
रोज सकाळी टॉमी*ला हा हमखास विचारतो
"फेरफटका मारायला का तू म्हशीस सोबत नेतो?"
सुडौल बांधा माझा याला कधी न जाणवतो
असा म्हसोबा....
हादडताना मचमच आवाज कशाला करतो?
भाजीआमटी भुरका मारून हा ओरपतो
घासाघासाला अपुल्या आईला आठवतो
असा म्हसोबा...
ऐकते जेव्हा मध्यरात्री याला घोरताना
शेजारणीला स्वप्नात पाहूनीया हसताना
पाठीमध्ये दणका याच्या घालावा वाटतो
असा म्हसोबा...
* टॉमीने येथे घरातला पाळीव कुत्रा असणे क्रमप्राप्त आहे.
----
माफीपत्र:
कवयित्रीला (खरंतर लेखिकेला) काव्य कसे करतात याची अजिबात कल्पना नाही. वृत्त, मात्रा, छंद हे शब्द तिला केवळ लिहिता येतात, त्यातले काही कळत नाही याची जाणीव ठेवून आणि हा तिचा पहिलाच प्रयत्न असल्याने तिला मोठ्या मनाने माफ करावे.
9 comments:
आम्ही समस्त नवरोबा कुळीतील प्राणी म्हणजे म्हसोबा काय ?
खर सांगु आपण लिहीलेले सर्व मान्य आहे. विडंबन मस्त जमल आहे. कोण म्हणेल आपल्याला
काव्य कसे करायचे याची कल्पना नाही ?
एक गंमत. आई ग काय मेली ही आमटी नुसती पाताळ पाताळ हाय... अरे मेल्या तुझाच बायकोनी केलीय. आ काय म्हणतेस, पाताळ हाय पण लई टेस्ट्फुल हाय बघ.
esakal.com चा शब्द्वविणा हा बॉग आहे. आपण त्या वर का बरे लिहीत नाहीत ? आपला लास वेगास वरील लेख त्यांना जरुर पाठविणे.
LOL!!!:-D
Aflatoon!
sundar kavita!
Thanks all of you!
ek number :D :D :D
-- nana
नवीन काही ?
Aata ajoon kiti divas ha mhasoba baghayacha?
Waiting for the next post!
किंग, घालते नवी कथा! मनासारखी जमत नव्हती म्हणून ठेवून दिली होती कपाटात. :)
Post a Comment