प्रकार

Thursday, December 04, 2008

का?

कितीतरी दिवसांत या ब्लॉगवर काही लिहिलं नाही. हल्ली लिहावसं वाटत नाही. लिहिण्यासारखं काही नसतं.वेळ नसतो, वाचन नसतं, इच्छाही नसते. मनात येणारे विचार मूर्त स्वरूपच घेत नाहीत. का त्यांनी मूर्त स्वरूप घेऊ नये अशी माझी इच्छा असते? ठरवण्यात मी असमर्थ आहे.

जेव्हा लिहिता येत नव्हतं तेव्हा लिहिण्याची जबरदस्त इच्छा होती, मनात आलेलं सर्व उतरवून ठेवावसं वाटायचं. जसजसं लिहिता येऊ लागलं तसतसे विषय कमी होत गेले. मनापासून लिहिण्याची ओढ कमी झाली. लोक वाचू लागले, लेखन त्यांच्यासाठी येऊ लागले. माझ्यासाठी काहीच नाही.

अजूनही मी लिहिते - लेख उतरतात पण ते माझ्यासाठी लिहिलेले नसतात. लोक वाचतात, त्यांना आवडेल, त्यांना रुचेल, त्यांना पटेल असं लिहिते. लोक ओळखतात, लेखन ओळखतात, शैली ओळखतात, चुका दाखवतात, अपेक्षा करतात. मी त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करते. पण माझ्या अपेक्षा अपूर्ण राहतात. मला काय लिहायचं आहे हे ठरवता येत नाही. लोकांना काय वाचायचं आहे याचा मात्र कधीतरी ठाव घेता येतो. लेखनातला प्रामाणिकपणा कमी झाला आहे. अतृप्ततेची भावना मनात सतत घोटाळते. काहीच साध्य होत नसल्याची तक्रार डोक्यात असते. अस्वस्थता इतरांवर फटके मारण्यास भरीला का पाडते याचे उत्तर मिळत नाही.

मी माझ्यासाठी लिहित नाही. का? कारण शोधते आहे.

7 comments:

HAREKRISHNAJI said...

काल पासुन मी विचार करत होते की आपण लिहीत का नाही आहात. असे आहे तर. ्

लिहीण्यासारखं काही नसते यावर माझा विश्वास बसत नाही. निदान आपण तरी असे म्हणु नयेत.

आपल्यामधे जबरदस्त स्पार्क आहे. मागे केव्हातती मी आपण लिहीलेल्या कथा वाचल्यानंतर नारायण धारपांची आठवण येत असे म्हटले होत, अजुनही माझे तेच मत आहे. आपण त्यांच्या प्रांगणातील विषय ्खुप प्रभावीपणॆ हाताळात आल्या आहेत. मी आपणाला ्सुचवणार होते आपण त्यांच्या प्रमाणॆ एखादी व्यक्तीरेखा केंद्रीयस्थानी लिहुन त्याभोअवती कथा का फुलवत नाहीत ? जरा कि चेतन, अशोक समर्थ आदी.

आपला दुसरा ब्लॉग ही पोरका पडाला आहे, त्यात आपण किती एखादा विषय घेवुन अभ्यासपुर्वक लेख लिहीत होतात.

केव्हातरी ही अशी एका टप्पावर बैचेनी यायलाच हवी, आणि ती तशी येतच असते.ही अस्वस्थता, हे असमाधान हे पुढील येणाऱ्या , होणाऱ्या नवनिर्मीतीची चाहुल असते.

त्या क्षणापर्यंत वर पाट्या टाकणे आनिर्वाय असते ते टाळता येत नाही.

लिहीत रहा. Please. स्वःतसाठी आणि हो आमच्यासाठी सुद्धा.

Priyabhashini said...

धन्यवाद. वेळ नसतो हे कारण खरेच आहे. :-) अहो, स्पार्कबिर्क काही नाही. सामान्य लिहिते पण आधी जे लिहिलं त्यापेक्षा बरं कसं लिहायचं याचा विचार करते. बरं लिहिण्यासाठी अधिक वाचनाची गरज आहे - इथे पुन्हा वेळेचा प्रश्न येतो. अनुभवांची गरज आहे - पण अनुभव डोक्यात घोटाळत नाहीत.

दुसर्‍या ब्लॉगवर हेमाडपंती मंदिरांवर लेख टाकला आहे. तो मनोगतावर पूर्वप्रसिद्ध झाला होता. वेळ झाला की अवश्य वाचा.

Yogesh said...

दुसऱ्यांना काय वाटेल याचा विचार न करता खरं म्हणजे जे वाटतं ते लिहिता यायला पाहिजे.

http://eserver.org/thoreau/life1.html


हा निबंध छान आहे. तो वाचल्यावर मलाही तुमच्यासारखेच वाटले होते

Monsieur K said...

Somerset Maugham (I dont know if you have read his 'Of Human Bondage' or 'The Razor's Edge') once said this:
"We write not because we want to, but because we have to."

My 2 cents - write whenever it/whatever appeals to you! as long as "You" enjoy it, keep writing..

Have a nice year ahead! :)

Priyabhashini said...

आजानु,केतन धन्यवाद.

हल्ली दिवस,काम,वेळ,वेग यांचा काहीच ताळमेळ राहीलेला नाही. :-) केतनची प्रतिक्रिया तर मी प्रकाशित केली नव्हती कारण मेलच तपासली नाही.

परंतु, तुमच्या दोघांच्याही म्हणण्यात तथ्य आहे.

Unknown said...

hi

tumhi khup chan lihita ......

nice blog.........achanak vachnat aala aani baryacha divsani kahi tari vegla vachala mi..........

mala vicharal tar lihina he manatal utarvyachi urmi aste.....


shalet astana mi hi lihayche pan ka mahit nahi madhe te sagl sutun gela....

mi hi lihin yapudhe suchala tar.........

Priyabhashini said...

ब्लॉगच्या प्रशंसेबद्दल आभार. आपणही अवश्य लिहावे. माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.

marathi blogs