प्रकार

Sunday, February 18, 2007

जो जीता वोही

गेल्या कित्येक दिवसांपासून माझा "ब्युसाफलस" पेंड खातोय. आता घोडाच तो पेंड नाही तर काय खाणार म्हणा, पण गाढवाला आपण कोणाचा घोडा आहोत ते नको लक्षात यायला?

'अलेक्झांडर द ग्रेट' लिहावा अशी बर्‍याच दिवसांपासून इच्छा होती. हल्ली विकिमुळे एक बरं झालंय की कोणीही उठून कोणत्याही विषयावर बिनधास्त लिहू शकतो. तसा सुमारे ३ वर्षांपूर्वी अलेक्झांडरवर बरेच वाचन केले होते. त्या अनुषंगाने ग्रीक इतिहासावरही बरेच हात पाय मारले होते परंतु काही दिवसांनी 'मेमरी लॉस' होणे "मैं कहाँ हूँ?" विचारणे हा माझा स्वाभाविक गुणधर्म आहे त्यामुळे सध्या आपण असे काहीतरी वाचले होते, हे जरा बिचकतच म्हणते.

मध्यंतरी ऑलिवर स्टोनचा अलेक्झांडर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता, अरेरे! काय टुकार सिनेमा होता. केवळ कॉलिन फॅरेल होता म्हणून पैसे वसूल झाले असे खोटे समाधान मानायचे. पण अलेक्झांडर काय किंवा ब्रॅड पिटने काम केलेला ट्रॉय काय, इतक्या historical inaccuracies कशा काय कोणी दाखवू शकतो? धन्य ते हॉलीवूड!

अलेक्झांडर चित्रपटात एक मजेशीर प्रसंग घुसवलेला आहे. पर्शियन सम्राट दरायसच्या बायकोला, स्ट्रटेराला बंदिवान केल्यावर अलेक्झांडर विचारतो, "हे राणी! मी तुला कसे वागवू?" आणि राणी उत्तरते, "राणीसारखी". अगं आई गं! या सिनेमावाल्यांनी आमच्या पुरुरव्याच्या तोंडचे शब्द चक्क चोरले. ते तर ते पोरसच्या नावाला आणि पात्राला फुलांच्या माळा आणि तोंडाला रंग फासून साफ रानटी करून टाकले होते. या हॉलीवूडवाल्यांची नेमकी कोणती अडचण असत्ते आयुष्यात कळायला मार्ग नाही. (What is their problem in life myan??)

याउलट, ग्रीकांच्या इतिहासात पोरसचे वर्णन साडेसहा फूटांहून अधिक उंच, धिप्पाड, देखणा, करारी असे केले आहे. 'मला राजासारखा वागव' असे सांगितल्यावर अलेक्झांडरला त्याच्या धाडसाच्या वाटलेल्या कौतुकाचे व्यवस्थित वर्णन केलेले आहे. या खेरीज अलेक्झांडरला असलेले भारतीय कला, संस्कृती यांचे कुतूहल, भारतीय संस्कृतीने आपल्याला परके समजू नये यासाठी केलेले प्रयत्न, अलक्षेंद्र म्हणून त्याचा भारतीय दस्त ऐवजांत केलेला उल्लेख, विद्वान ब्राह्मणांशी केलेल्या चर्चा, आपल्यासोबत ग्रीसला चला असे अनेक विद्वानांना केलेले आवाहन आणि कल्याण ऋषींना ग्रीसला नेण्याची जबरदस्त इच्छा इ. इ.

नव्या वर्षाची सुरूवात म्हणून विकिपीडियावर 'अलेक्झांडर द ग्रेट' खरडायला घेतला होता. पब्लिक लायब्ररीतून पुस्तके आणली, वाचन सुरू केले. एकदा लेखन सुरू केल्यावर मात्र मारुतीच्या शेपटासारखा लेख वाढतच जातोय. मॅसेडोनियन, ग्रीक, एजियन, पर्शियन, कित्येक शहरे, नद्या, प्रदेश, लढाया, सरदार, मित्र, शत्रू, मांडलिक, फितूर प्रत्येकाची गणती ठेवावी लागते. अगदी या ब्युसाफलस नावाच्या गाढवाचीही.

जो जीता वहीं सिकंदर आणि मुकद्दर का सिकंदर खेरीज अलेक्झांडर कुठे आठवतो आम्हाला? नाही, तसे ही आमीर आणि अमिताभच आठवत असावेत म्हणूनच खर्‍या अलेक्झांडरबद्दल लिहायला घेतलं होतं परंतु गेले बरेच दिवस या वाईट हवामान, सुपर बोव्ल (घोडा नाही तर घोड्याची नाल), त्यानंतर आमचे मराठी मंडळ, शाळा, मित्रमंडळ यांना सगळे कार्यक्रम एकापाठोपाठ एक करावेसे कसे वाटतात कोण जाणे? येणार्‍या बर्‍याच दिवसांत रात्री थोड्या सोंगं फार अशी परिस्थिती आहे. पुढचे काही महिने भरघोस कार्यक्रमात, जबाबदार्‍यांतच जाणार असल्याने अलेक्झांडरला भोज्जा करायला एप्रिल उजाडेल की काय अशी भीती सध्या मला वाटते आहे आणि एप्रिलपर्यंत उत्साह गळला तर? आमचं घोडं अडूनच राहिलं तर?.... :(

.... म्हणूनच हा लेखनप्रपंच. कधीतरी मनांत आलं की जो जिंकतो तोच सिकंदर असेल तर या सर्व लढाया संपल्यावर कधीतरी पुन्हा अलेक्झांडरशी लढाई लढायला घेईन, आणि यावेळीही खुश्शाल जिंकू दे त्या सिकंदराला.

16 comments:

HAREKRISHNAJI said...

How true is Porus asking "'मला राजासारखा वागव'?
Recently I had read that the history written by Greeks are their version. Alexander The Great was in very bad shape in India and he returned loser.
And you are write about the movies. They spends millions on making but do not spend at all on reserarch and ground work

Priyabhashini said...

Thanks a lot for reading my blog. One must read all possible historical accounts to write about history and I have read Porus demanding 'मला राजासारखा वागव' in each & every historical document that I have come across.

When it comes to the history of Alexander; Arrian and Plutarch are the best historians (and sources)for all sorts of references/ information. Arrian mentions Porus' demand and it was definately not the statement that Strattera said.

You are absolutely right about these movie makers, watching such movies develops frustration. Thanks once again.

Monsieur K said...

Your post prompted me to go and read about Alexander on Wikipedia! I read the one in English, but have you been working single-handedly on the one in Marathi?
Hats off to you!

To be honest, I loved Troy - I havent read Achilles' real story, but I believe a movie director/script-writer should be allowed some creative freedom within permissible limits.

After all, isnt history often written by the victors? And as centuries go by, myths grow a hundredfold, and facts get distorted.

I have always wondered - in the Mahabharata, had the Kauravas won, we would have learnt how unfair the Pandavas were, and how righteous the Kauravas were?

Or if in the Ramayana, if Ravana had killed Rama, then the epic could have been Ravanayana, and Amol Palekar would have the twin names "Ravan-prasad Vishrav-prasad Sharma" and "Kumbhakaran-prasad Vishrav-prasad Sharma" in Golmaal. :D

Am I letting my imagination go beyong permissible limits here? :)

~Ketan

Priyabhashini said...

Ketan Thanks a lot for your comment.

You guessed it! I have been single handedly working on Alexander in Marathi and I haven't translated Alexander from English Wiki to Marathi. I have been reading few reliable books, websites, greek culture etc and slowly compiling info in my words.

When it comes to History I don't think anyone has right to manipulate it in the name of creativity. Creative freedom is very well to an extent but one shouldn't take the liberty to modify historical details. Ofcourse, this is my view.

History is written by historians and to some extent yes! by the victors. That doesn't mean there are false details. There can be some exaggerations here and there.

Epics are written by poets and fabrications are like Mt.Everest in this case.

Ramayana and Mahabharata are epics, not history. History is written with the accurate details of dates,months, years, maps, numbers etc.

Arrian and Plutarch, unlike Valmiki and Vyasa have written history after the death of Alexander. They have worked a lot on data. Knowing that Alexander did not have any successor their details are less influenced by the greek rulers.

Unfortunately, India didn't have historians until the time of Ashoka or so.

Now I don't know how did you remember Golmaal but I love this movie. :))))

Monsieur K said...

Hi Priya,

Thanks for your clarifications.
I agree history should not be distorted or manipulated in the name of creativity.

But then Hollywood movies will never depict history to the T, will they? Their primary focus will be entertainment & box office collections, and not historical authenticity!

The best sources for authentic & accurate history will be the ancient texts & books available in libraries, and now thanks to enthusiastic people like you, even online resources like Wikipedia.

Also, pardon me for my example of epics like Ramayana/Mahabharata - they are indeed works of fiction. The point I was trying to make was about history being written by victors.

Another example would be a book I had read about the origin of the Taj Mahal - that it is not Mumtaz Mahal's tomb, but it is Lord Shiva's temple. Again, the authenticity of either versions remains debatable.

History was my favorite subject in school, but I admit that I have never taken the pains of opening a history book other than school texts. Your painstaking efforts of reading Arrian & Plutarch's works, websites & other resources, and then writing down everything in Marathi are indeed quite commendable.

Have you also posted any other articles in the history section? Would love to read those.
Could you please email me the links at ketank21@yahoo.com?

Hope you finish your work on Alexander soon!

~Ketan
p.s. Amol Palekar's name in Golmaal was "Ram"prasad "Dashrath"prasad Sharma(??), wasnt it? Its one of my fav movies too! I always wonder if his name would have changed had Ravan defeated Ram. ;-)

Priyabhashini said...

Hey Ketan,

Thanks once again. You are absolutely right about Hollywood producers/ directors. They make movies to entertain people and why blame them simply remember SRK in Asoka. (Do I need to say more?)

Even I had not read much history after 10th standard but then here I have access to fabulous library and have ample time to go thru books and details.

I had also written about Mangolian history (Changiz khan - father of all khans in our nation (just kidding!))

You will find all these links on my other blog .

विखुरलेले मोती

अमोल पालेकरचं नाव बदलंल तर खरचं मजेशीर होईल. :))) मला गोलमालमध्ये उत्पल दत्त सगळ्यांत आवडतो. विशेषत: त्याचे इश्श्श!! आणि अच्छा! म्हणणे.

पुन्हा एकदा धन्यवाद. your comments are truely encouraging. मनापासून बरं वाटलं.

Raj said...

लेख आत्ताच वाचला. छान आहे. विकिवरचा लेखही वाचला. त्यावरून तो लिहिण्यासाठी घेतलेली मेहनत दिसून येते. तुझ्यासारखे लोक असल्यामुळेच विकीपीडीया इतका यशस्वी होतो आहे.
Brava and keep it up! (In italian bravo is for a boy and brava is for a girl! :-)
राजेंद्र

Anonymous said...

लेख ठीक आहे पण त्यामागच्या भावना खूप आवडल्या. सिकंदर खरच जगज्जेता होता असे तुम्हाला वाटते का?

आई आणि पाहुणा दोन्ही आवडल्या. पुढची गूढकथा कधी टाकताय?

- निनाद

Priyabhashini said...

राजेंद्र,
Grazie!! Italian म्हटल्यावर लक्षात आलं की कोणाचा प्रतिसाद आहे. तुझी अनुदिनी वाचली. लिहित जा, मनातलं बरंच लिहिता येतं.

विकिवरचा लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

मला फक्त Grazie and Mama Mia! एवढंच इटालियन येतं. Bravo! ही.

निनाद,

या लेखाला काय रंगरंगोटी करणार? मनात आलं लिहावं म्हणून लिहिलं, इतकचं.

अलेक्झांडर उत्तम सेनापती होता, कुशल होता. तो किती उत्तम राज्यकर्ता होता ते सांगता येत नाही. माझ्यामते जगज्जेता होण्यासाठी युद्ध करण्याची गरज नसते. अलेक्झांडरला माणसे जितकी ओळखतात तेवढीच बहुधा ऍरिस्टोटललाही ओळखत असावीत.

विद्वत्ता आनंदाने पूजली जाते, शक्तीच्या जोरावर आनंद पसरवता येत नाही. असो.

आई आणि पाहुणा आवडल्याबद्दल धन्यवाद. सारख्या सारख्या गूढकथा लिहिल्यातर या बाईला वेड लागलं आहे असं वाटायचं लोकांना. :))

एक लिहिते आहे पण पूर्ण व्हायला एप्रिल-मे उजाडेल. सध्या शक्य नाही.

प्रतिसादाबद्दल तुम्हा दोघांचे अनेक धन्यवाद!

Raj said...

प्रिया,
मी आधी हॅम्लेट या नावाने लिहीणार होतो पण म्हटले तेवढी होम्सगिरी तू करशील. :-)
एक सांगायचे राहीले. ग्रीक साहित्याबद्दल, लेखकांबद्दल वाचायलाही निश्चीतच आवडेल.
वर ऍरिस्टॉटलचा उल्लेख आला म्हणून आठवले.
राजेंद्र

Priyabhashini said...

होम्सगिरी :))))

MAMA MIA!! (हे Oh my gosh! प्रमाणे वापरतात ना?) काय पण प्रसिद्धी* आहे माझी पण हो आलं चटकन लक्षात.

मला इलियड, ओडिसी, होमर, सॉक्रेटिस यांच्याबद्दल लिहायचं मनात आहे, कधीतरी केलं पाहिजे.

तुझ्या अनुदिनीसाठी शुभेच्छा! आपल्या आवडी समान असल्याने तुझ्याकडूनही काहीतरी वेगळं वाचायला मिळेल अशी आशा करते.

* मी बरेचदा लोकांना माझा पत्ता -
220B Baker Street, London (शेरलॉकच्या एक घर आधीच) असा सांगते. (just kidding!)

Raj said...

Mamma Miaचा वापर बरोबर आहे. :-)
वा! होमर, ओडीसीबद्दल वाचायला मजा येईल. मला "मिथ ऑफ सिसिफसही" वाचायचे आहे.
आत्ताच मी एक् पुस्तक वाचले, "A Hero with Thousand Faces"
मिळाले तर जरूर बघ. त्यात जगातील सर्व मायथोलॉजींमध्ये किती साम्ये आहेत ते सांगीतले आहे.
तू प्रसिद्ध आहेस हे माहीत होते पण चक्क बेकर स्ट्रीट याची कल्पना नव्हती. :-)
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

HAREKRISHNAJI said...

अरेच्या तुम्ही तर शेजारी निघालात.

MilindB said...

प्रिया (लि/ंभाषिणी)

मी exmanogati नावाचा याहू गट निर्माण केलाय. त्यात सामील हो. मनोगताला लोकशाही पर्याय म्हणून नवीन संकेतस्थळ तयार करणे हे आपले सर्वांचे काम आहे. त्यात सर्वांचाच सहभाग अपेक्षित आहे. उगाच वाट पाहू नकोस.

- मिलिंद

Priyabhashini said...

मिलिंद,

मी अर्थातच वाचली होती तुमची पोस्ट. मी मनोगताकडून फार अपेक्षा ठेवते आहे असे अजीबात नाही परंतु ज्या कारणांमुळे मनोगतावर अनुमतीची गरज भासू लागली त्या कारणांनी मला कोणत्याही नवीन स्थळी (विकि आणि माझा ब्लॉग सोडून) जाण्यापासून सध्यातरी रोखले आहे.

एखाद्यावर राग आला तर उठसूठ त्याची बदनामी करणे, त्याच्या घरापर्यंत पोहचून त्यांच्या पोराबाळांना खेचून आणणे हे सर्व मला पसंत नाही. काही मनोगतींविषयी असे लेख लिहिले गेले होते तेव्हापासूनच माझा मनोगतातील एकंदरीत interest कमी होत गेला. कोणत्याही इतर स्थळांवर (including this new project) तसे होणे अशक्य आहे असे मला वाटत नाही, त्यामुळे मला सध्यातरी थांबणे क्रमप्राप्त आहे.

छान, मस्त, आवडलं इतकच लिहिण्यासाठी बरेच मिळतील, विशेषत: बायका. मला तेवढंच करायला एखाद्या संकेतस्थळाचे सदस्यत्व घ्यायचे नाही आणि बरं, soft target आहे म्हणून वाट्टेल ते बरळलेलंही खपवूनही घ्यायचं नाही.

लेखनाचा किडा वळवळला तर अनुदिनी आणि विकि आहेच आणि त्यातून जाऊन जाऊन जाणार कुठे, येईनच एक दिवस.

But you guys go ahead and accept my best wishes for your latest endeavor.

Unknown said...

Your blog rocks..and the name of the blog sucks :P

Good points about your blog are:
1. Well studied and well thought points.
2. A proper order of expressing thoughts.
3. Global perspective and lack of narrow vision.
4. Putting forth all the angles of the problem.

You are doing splendid job and we need more and more quality blogs like yours.

Just want to say, you could have put more thought for the name..alas...whatever happened cannot be changed :)

marathi blogs