प्रकार

Saturday, June 24, 2006

डायव्हिंगचा क्लास

"आपल्या हायस्कूल मधे डायव्हिंग शिकवणार आहेत. तू जाशील?" मी माझ्या मुलीला सहज विचारल.

"डायव्हिंग म्हणजे ते ऑलिम्पिक्स मधे दाखवतात ते?"

"हो तेच."

"नाही. मी नाही जाणार. मला भीती वाटते. दुसरं काही नाहिये का? डायव्हिंगच का विचारलस?"

"तू जावस असं मला मनापासून वाटत म्हणून."

"पण मी सांगितलना कि मला भीती वाटते."

"कसली भीती वाटते ते सांगशील का? खोल पाण्यात पोहण्याची? पण तुला १० फूट पाण्यात पोहोता येत १६ फूट पाण्यातही येईलच."

"पोहोण्याची भीती नाही वाटत. मला पोहायला आवडत."

"मग उंचीची भीती वाटते का? विमान, सिअर्स टॉवर, CN टॉवर वर भीती नाही वाटली? CN टॉवरच्या काचेच्या जमिनीवर उभं रहायला नाही का वाटली भीती?"

"नाही. उंचीची भीती नाही वाटत ग मम्मा. त्या टॉवर्स वर आणि विमानात आपण सुरक्षित असतो ना. उंचीवरुन खाली झोकून द्यायची भीती वाटते."

"सरळ पाण्यात पडणार हे माहित असूनही? तर मग एक सांग तुझ्यासारखीच इतर लहान मुलं, कदाचित तुझ्यापेक्षा लहानही जेव्हा न घाबरता पाण्यात झेप घेतील तेव्हा आपण त्यांच्यापेक्षा कमी पडतो आहोत ही भीतीही तुला वाटेल नाही का?"

"ह्म्म्म्म!!!!"

"भीती आहे तुझ्या मनात आहे. तू ती मनातून काढून टाकलीस तर फूटबोर्डवरुन उडी मारायला अजिबात भीती वाटणार नाही, उलट मज्जाच येईल बघ. जो माणूस भीत रहातो ना तो मिळालेली संधी गमवत असतो. खरतरं भीती कमी व्हावी म्हणूनच तू डायव्हिंग शिकावस अस मला वाटत."

"तुला नाही कसली भीती वाटत का ग मम्मा?"

"वाटते ना. प्रत्येकाला कसली ना कसली भीती वाटते. बिशेषत: अज्ञाताची. तशी मलाही वाटते पण भीतीला मारतो विश्वास. तूही मला डायव्हिंग सहज जमेल असा विश्वास मनात निर्माण कर आणि बघ भीती कशी पळून जाते ती. माणसाने आपल्या एकेका भीतीला असच मारुन टाकायच असत."

"खरचं मग कशाची भीती रहाणार नाही? Not even death?"

"Not even death! आता जाऊन झोप. उद्या सकाळी मला सांग की तुला जायचय कि नाही ते. तू जायलाच हवस अशी माझी जबरदस्ती अजिबात नाही. तुझ्या मनात भीती असेल तर न गेलेल उत्तम असं मला वाटत."

-----

(दुसऱ्या दिवशीची सकाळ)

"मम्मा मी जाईन डायव्हिंग शिकायला?"

"खरचं? हे तू माझी इच्छा आहे म्हणून मला घाबरुन तर नाही ना म्हणते आहेस?"

"नाही ग मम्मा! मला नाही भीती वाटत. पण तुला वाटत की मला डायव्हींग जमेल?"

"हो! माझा तसा विश्वास आहे."

-----------

काल डायव्हिंगचा पहिला लेसन झाला. पूर्ण संध्याकाळ उंचावरुन पाण्यात झेप घ्यायला कशी मज्जा येते ह्या चिवचिवाटात कशी निघून गेली ते कळलेच नाही.

6 comments:

Nandan said...

lekh aavaDala. chhan aahe. Rupakaatmak mhaNata yeil.

Priyabhashini said...

धन्यवाद नंदन! लेखाला रुपकात्मक म्हणता येईलच पण हा संवाद प्रत्यक्ष घडून आला. तो जसाच्या तसाच लिहून काढला. संवाद खुलवले नाहीत. आनंद यात कि इतक्या कमी संवादात पोरीच मन वळवता आलं.

Tulip said...

malaa pan avadala g lekh. khup chhan susanvad vatala. majhya manat ajun ahe divng chi bhiti:p

Priyabhashini said...

Tulip and Rahul

Thanks a lot.

Anonymous said...

"हे तू माझी इच्छा आहे म्हणून मला घाबरुन तर नाही ना म्हणते आहेस?" is a really complex sentence. I'll try to bracket it:
[हे तू [[माझी इच्छा आहे म्हणून] [मला घाबरुन] तर] नाही ना म्हणते आहेस]
Nice vignette. Very lively and lifelike dialog. Thanks. पीटर

Priyabhashini said...

Thanks Peter, I should have put punctuations in that sentence.

marathi blogs