प्रकार

Sunday, May 11, 2008

आय फील सो लकी....

काल आम्ही वर्गात हस्तकलेच्या तासाला आपापल्या आईसाठी हे उघडझाप करणारं फूल बनवलं. याच्या प्रत्येक बंद पाकळीवर तुझ्यासाठी एक छोटासा संदेश आहे. मला माझी आई का आवडते हे त्यात सांगितलं आहे.

पहिली पाकळी सांगते की मला माझी आई आवडते कारण ती माझ्या खाण्या-पिण्याकडे लक्ष पुरवते. मला भूक लागेपर्यंत थांबत नाही. माझे खाणे, माझा डबा, माझे जेवण यांकडे तिचे काटेकोर लक्ष असते.

दुसरी पाकळी सांगते की माझ्या आईला माझी काळजी घ्यायला आवडते. माझे केस विंचरायला, माझे कपडे धुवायला, इस्त्री करायला, माझ्यासाठी खरेदी करायला तिला आवडते.

तिसरी पाकळी सांगते की मला दुखलं-खुपलं, मी आजारी असले की माझी आई हवालदील होते. ती त्यावेळी थोडीशी जास्तच प्रेमळ असल्यासारखी वाटते.

चौथी पाकळी सांगते की माझ्या आईला माझ्याबरोबर बसून वाचन करायला आवडते. मी काय वाचते याकडे तिचे लक्ष असते. ती ग्रंथालयातून मला पुस्तके आणायला मदत करते आणि दररात्री ती तिचे पुस्तक वाचते आणि मी माझे पुस्तक वाचते. मला तिच्याबरोबर असा वेळ घालवणे खूप आवडते.

पाचवी पाकळी सांगते की ती मला तिच्या कामात मदत करायला देते तेव्हा ती मला खूप आवडते. यावेळी आम्ही काहीतरी खेळ खेळत कामे उरकतो.

सहावी पाकळी सांगते की मला तिच्याशी गप्पा मारायला खूप आवडतात. माझ्या शाळेच्या, वर्गातल्या, मैत्रिणींच्या गोष्टी ती दर संध्याकाळी ऐकते. मला एखादे दिवशी भीती वाटली तर तिच्या कुशीत घेते.

सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही.

आय फील सो लकी, कॉझ आय हॅव यू विद मी!

मदर्स डे निमित्त माझ्यात आणि लेकीत झालेला संवाद.

10 comments:

प्रिया said...

Oh! And you are lucky to have such a doting daughter :) Happy Mother's day!

Anonymous said...

माय लेकीचा संवाद सहीच आणि तितकाच हळवा करणारा !!!-प्रा. डॉ.

Monsieur K said...

A doting daughter and mother :)
Happy Mother's Day!

HAREKRISHNAJI said...

Happy Mother's day !

Thank god the silence is finally broken. We all missed you.

Priyabhashini said...

प्रतिसादांसाठी अनेक धन्यवाद.

I have been busy past several days. Somehow, took out time to scribble this little one.

Thanks a lot once again.

Anonymous said...

प्रियाली खूपच हळवा करणारा संवाद. छान लिहीला आहेस. आई गेल्यावर लहानपण संपतच हे अगदी खर आहे, आणि दुर्देवाने स्वानुभव आहे :(

सखी

Anonymous said...

प्रियाली खूपच हळवा करणारा संवाद. छान लिहीला आहेस. आई गेल्यावर लहानपण संपतच हे अगदी खर आहे, आणि दुर्देवाने स्वानुभव आहे :(

सखी

priyadarshan said...

Please find out more time for all of us . Even your other blog "vmoti" is awaiting for you.

Priyabhashini said...

Thank you so much..but I don't get time as before.

I have been writing an article for VMOTI for past few days and haven't gone beyond a page.

ऍडी जोशी said...

तुमच्या काही गोष्टी वाचल्या. भन्नाट लिहिता तुम्ही. तुमच्याहून लहान असल्याने शाब्बास नाही म्हणू शकत. पण भावना समजून घ्या.

marathi blogs