प्रकार

Tuesday, February 13, 2007

पांढरेशुभ्र वादळ

हिरवे हिरवे गार गालिचे
कधी बरे नजरेस यायचे?


लाल समुद्र, काळा समुद्र यांच्यासारखा एक सफेत समुद्र रशियाच्या वायव्येस आहे. 'गंगा आली रे अंगणी' प्रमाणे तो सध्या आमच्या दारी अवतरला आहे.

गेले कित्येक दिवस आमच्या शहरात बर्फाचा शुभ्र गालिचा सर्वत्र पसरला आहे आणि आज आधीच्याच चार इंच जाड्या या गालिच्यावर आठ ते बारा इंच बर्फ पडला आहे, पडतो आहे. सोबतीला ४०- ४५ मैल वेगाने घोंघावणारे वादळी वारे, त्यांच्या जोडीने तांडव करणारे हिमकण आणि दृष्टी मर्यादित करणारा मंद प्रकाश.


त्यातल्या त्यात उत्तम गोष्ट म्हणजे राज्यात शाळा, महाविद्यालये आणि बहुतांश कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अशावेळी घरात फायरप्लेसमध्ये जाळ करायचा, हातात वाफाळलेल्या चहा-कॉफीचा मग घ्यायचा, शाल पांघरून एखादा मस्त चित्रपट टाकायचा आणि तोंडात एखाद्या आवडीच्या गाण्याची धून घोळवायची. जसे,

Oh the weather outside is frightful
But the fire is so delightful
And since we’ve no place to go
Let it snow, let it snow, let it snowDSC00798DSC00800DSC00801


"कधीकाळी" (just kidding!) ही माझ्या घराची मागची आणि पुढची बाजू होती. इतर वेळेस येथे एक हिरवेगार मोकळे मैदान, रस्ता आणि गाड्या पार्क करायला पार्किंग लॉट असतो. ते हिरवेगार मैदान पुन्हा नजरेस पडायला बहुधा एप्रिल उजाडेल.

8 comments:

nanocfd said...

ikade alo tevha mala snowing baddal khoop utsukata hoti. pan saddhyacha tandav baghata, kadhi ekda winter samptoy asa zalay.
pavsat bhijaychi maja tari yete, barfat kahich karta yet nahi.

-stay warm and safe.
::nana

कृष्णाकाठ said...

मला तुम्ही केलेली लेखाची सुरुवात खूप आवडली!

हिरवे हिरवे गार गालिचे
कधी बरे नजरेस यायचे?

बकी बर्फा बद्दल विचाराल तर अशा वेळेस सरळ "Let it snow, Let it Snow" ऐकत बसण्याशिवाय काही पर्याय नाही. :-(

Priyabhashini said...

नाना
दुष्टचक्र संपलं नाहीये, बरेचदा मार्चमध्येही स्नो पडतो. मी तुला नेहमी सांगते तसंच होईल सवय हळूहळू. सांभाळून राहा.

कृष्णाकाठ,
अनेक धन्यवाद. गेले सुमारे १०-१२ दिवस (किंवा जास्तच) सर्व आसमंत सफेत आहे, त्यात कमी म्हणून की काय आतापर्यंत १२-१३" स्नो झालाय, रात्री आणखी होईल.

मन खट्टू करण्यापेक्षा Let it snow म्हटलेलं बरं! :)

yogesh said...

पुण्याला थोडा बर्फ पाठवा की... आता लोडशेडिंगमुळं उन्हाळ्यात काय होणार या विचारानेच घाम फुटतो :)

Priyabhashini said...

हाहा! हवा तेवढा पाठवते. आपल्याच मालकीचा आहे. सध्या बाजूला सारलेल्या बर्फ़ाचे ६ फूट उंच ढिगारे साचले आहेत.

Monsieur K said...

woww! sitting besides a fireplace, reading a book, sitting in a rocking chair with 'Let it snow' playing in the background, and watching snowflakes through the window - s'thing that i'll never be able to experience in Florida! tya karta up north kuthe tari jaaylaa paahije!

i'll repeat what 'nana' said,
stay warm n safe, n enjoy the winter!

~ketan

Priyabhashini said...
This comment has been removed by the author.
Priyabhashini said...

Well! Thanks a lot Ketan but believe me you are at the best place in the world.

Imagine life where temperatures are continously below 0, you can't get out of the house for days, you have no place to go, or you need to cross snow ocean to get to your car.

I wish I am at Miami at this time.

marathi blogs